एल्फिन्स्टन रोड दुर्घटना
एल्फिन्स्टन रोड दुर्घटना दुर्घटनाग्रस्त सर्व कमनशिबी लोकांना श्रद्धांजली , देव त्यांच्या नातेवाईकांना यातून बाहेर पडण्याचे बळ देवो . खरोखर या घटनेमध्ये सरकारचाच दोष आहे ? आपल्या देशातल्या लोकांना आणि विरोधी पक्षांना काही झाले तरी सरकारला दूषणं देण्यात धन्यता वाटते . जे एल्फिन्स्टन ला घडलं ते कुठल्याही स्टेशनवर घडू शकतं अगदी रुंद असलेल्या पुलांवरही आणि याचे कारण म्हणजे शिस्तीचा अभाव आणि स्वतःपुरतं पाहण्याची वृत्ती . पावसापासून बचाव म्हणून पुलाच्या टोकांना गर्दी करून पुलावर देखील गर्दी करणारे या घटनेला जवाबदार नाहीत का ? पूल तुटला अशी अफवा पसरवणारे जवाबदार नाहीत का ? का यासाठी देखील सरकारच जवाबदार . का लोकं पुलावर थांबली आहेत म्हणून रेल्वेनी लोकल्स पण थांबवायच्या . पूल अरुंद आहे म्हणून कंठशोष करणाऱ्यांनो जर पुलाचे बाहेर पडणारे रस्ते आडमुठेपणाने वागणाऱ्या लोकांनी अडवले नसते तर अशी दुर्घटना घडली असती का ? मला तर असं वाटतं कि हा घडवलेला अपघात आहे , सरक...