आनंदाश्रू
आज फेसबुक वर एक कुत्रा कसा त्याच्या मालकाला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेला याची कहाणी होती. मला एकदम ती भूतकाळात घेऊन गेली. माधववाडी दादर मध्ये लहानाचा मोठा झालो, चाळी होत्या सर्व, साधारण २००४-५ सालची गोष्ट असेल. आमच्या मजल्यावर एका भटक्या मांजरीने काही पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक आमच्याच मजल्यावर राहिला. मजल्याच्या WC च्या पॅसेज मध्ये पडून असायचं. खूप लहान पिल्लू होतं म्हणून त्याच्यासाठी मी आणि माझा भाऊ दूध ठेवायचो आणि त्याच्यावरून आमच्या शेजाऱ्यांशी आमची भांडणं व्हायची. आम्हाला तो काही करू शकत नव्हता मग त्याने त्या पिल्लाला त्रास द्यायला सुरवात केली. पिल्लावर पाणी टाकणे, त्याच्या बसण्याच्या जागेवर पाणी टाकणे असे प्रकार चालू झाले. रोज सकाळी भांडण आणि त्या शेजाऱ्याला शिवीगाळ करून ऑफिस असा प्रकार चालू झाला. त्या पिल्लाच्या आईला कळत होतं आम्ही तिच्या पिल्लाची काळजी घेतोय, इतर कोणी जवळ आले तर ती फिस्करायची. मी एके दिवशी ऑफिस ला गेलो होतो आणि भाऊ पण बाहेर होता त्याचा फायदा घेऊन त्या शेजारच्या डुकराने त्या लहान पिल्लाला ढकलून दिलं, तिसऱ्या मजल्यावरून ते पिल्लू खाली पडलं, माझ्या बाबांन...