Posts

Showing posts from August, 2018

जयंती आणि जन्मोत्सव

जयंती आणि जन्मोत्सव   सध्या एक फॅड निघालं आहे जुन्या शब्दांचे विपरीत अर्थ काढून नवीन शब्दांचा सोशल मीडिया वर उंदरासारखं सोडण्याचा .  जन्मोत्सव , हा एक नवीन प्रयोग , जशा गुढीपाडव्याच्या “ शोभायात्रा ” तसाच हा जन्मोत्सव . आणि हा शोध लावणारे सोयीस्कर रित्या तिथ्या विसरतात . नुकताच गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा संबंधशोध लावणाऱ्यांनीच जन्मोत्सवाच्या शोधाचे अकलेचे तारे तोडले आहेत . तारे तोडले म्हटले अशासाठी कारण तिथीप्रमाणे आज छत्रपतींची पुण्यतिथी .  जयंती म्हणजे जन्मदिवस ही एक सोपी व्याख्या आहे मग देवांचे , साधू संतांचे , अवतारी व्यक्तींचे असे भेदभाव कशासाठी . जयंती म्हटल्यावर त्याचा उत्सव होऊ शकत नाही ? मग शिवजयंती काय आहे , दत्तजयंती ( गुरुपौर्णिमा म्हणजे दत्तजयंती नाही ) गणेश जयंती ( माघी ), नृसिंह जयंती , गुरु नानक जयंती , हे जन्मदिवस उत्सव स्वरूप नाहीत ?  थोडक्यात हनुमान जयंती चुकीचे आणि हनुमान जन्मोत्सव बरोबर हा प्रकारच चुकीचा आहे . सावरकर जयं...

अविश्वास ठराव

लोकशाहीची काय विडंबना आहे पहा . रात्री १२ वाजेपर्यंत एकत्र येऊन सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या विषयावर चर्चा आणि मतदान करत होते . जनतेच्या कुठल्या प्रश्नासाठी रात्री १२ पर्यंत खासदारांनी चर्चा केल्याचे ऐकिवात नाही . हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे . मध्यावधी निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा कमी काळ राहिला असताना अविश्वासदर्शक ठराव पटत नाही . या ठरावापुरते बोलायचे झाले तर मोदी सरकार जिंकणार हे निश्चित होते . किती तरस एकवटतात आणि आपल्यापैकी कोण दगा देणार येत्या निवडणुकीत हे स्पष्ट झालं . चंद्राबाबू नायडू सारख्या नेत्याकडून हे अपेक्षित नव्हतं . उद्या प्रत्येक राज्याने विशेष दर्जा पाहिजे म्हणून घोळ घालायला सुरुवात केली तर कसं व्हायचं .  काँग्रेसची प्रत्येक पातळीवर हार झालेली आहे अगदी अविश्वास ठराव दाखल करून घेताना सुद्धा . हा ठराव चर्चेसाठी आणि मतदानासाठी आला चंद्राबाबूंमुळे आणि मग संधी मिळतेय म्हटल्यावर काँग्रेस ने गरळ ओकण्याचा प्रयत्न केला पण गटार च दिसलं . राहुल ग...

आरक्षण

आरक्षण   सध्या कळीचा मुद्दा ठरत आहे . त्याच्या बाजूने आणि विरुद्ध देखील चर्चा चालू आहेत . मी तर या मताचा आहे की जर गरज असेलच तर आरक्षण आर्थिक निकषांवर हवं . आणि जे आरक्षणासाठी पात्र आहेत त्यांना सर्वसामान्य कोट्यामध्ये पात्र ठरवलं जाऊ नये .  याच विषयावर माझ्या एका मित्राचे विचार वाचले . कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अनेक क्षेत्रात शिरलेलं आहे . स्किल्ड आणि नॉन - स्किल्ड अशा दोन्ही क्षेत्रात या तंत्रज्ञानाची प्रगती चालू आहे . जिथे अनेक नोकऱ्यांवर गदा येऊ शकते तेथे जातीच्या आधारावर आरक्षण हा किती योग्य मुद्दा ठरू शकतो . माझ्यामते आरक्षणापेक्षा प्रशिक्षण , इनेबलमेंट जास्त प्रभावी ठरू शकेल आणि ते देखील जातीनिकष न ठेवता .  स्वप्नील सुनील गुप्ते   + ९७१५५९२७४०८५