भगवंत आणि गुरु
भगवंत आणि गुरु हल्ली अनेक ग्रुप्स वर बरेच मेसेज फिरत असतात आणि गुरुची महती भगवंतापेक्षा जास्त कशी आहे अशा आशयाचे मेसेज देखील असतात . माझ्यामते भगवंता पेक्षा गुरु श्रेष्ठ असा विचार योग्य नाही . भगवंत , परमात्म्याजवळ पोहोचण्याचे ३ मार्ग आहेत . एक , त्या परमात्म्याबरोबर थेट कनेक्शन जे या कलियुगात केवळ अवतारी लोकांनाच शक्य आहे किंवा सत्य त्रेता द्वापार या युगातील पुण्यसंचय या कलियुगातील ज्या जीवाकडे आहे त्यालाच थेट कनेक्शन . दुसरा मार्ग जो कोणत्याही दैवताच्या गणांमार्फत परमात्म्याजवळ पोहोचवतो . मग ते शक्ती स्वरूप असो , शैव किंवा वैष्णव पंथाचे असो भक्तांनी प्रार्थना केल्यावर सर्वप्रथम इष्टदेवतेचे गण कर्म , पाप , पुण्य याचा लेखाजोखा मांडतात आणि तो रिपोर्ट सिग्नेटरी ऑथॉरिटी कडे सही साठी पाठवतात . हा रिपोर्ट अगदी अचूक असतो म्हणून बरेचवेळा भक्त निराश होतात , त्याला भगवंताची अवकृपा समजतात . कलियुगात हे घडणार याची भगवंताला पूर्ण कल्पना होती म्हणून त्यानी ...