Posts

A Journey from Positive to Negative

A journey from Positive to Negative  Corona, Covid 19, pandemic, quarantine, isolation all these words I had been hearing, reading in various social media however had never thought that I had to experience it personally.  I stay at Dubai. Hygienically much better place than India and have very strict rules to fight covid 19. If one has to step out, then wearing face mask & gloves is must. To buy usual grocery I used to follow this rule strictly. And despite of this I got infected. How ? Still I have no clue. But I can recall how I started feeling unwell.  It was 11th May night, I started feeling breathing problem. It was difficult for me to breath. By changing sides I got temporary relief and night passed but when I woke up and went to bathroom i was grasping for breath. Was holding the bathroom wall and opening mouth trying to take air. I went back to bedroom and rested. After resting felt good. Rest of the day was normal, whenever I had made moves or changed posture...

आनंदाश्रू

आज फेसबुक वर एक कुत्रा कसा त्याच्या मालकाला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेला याची कहाणी होती. मला एकदम ती भूतकाळात घेऊन गेली. माधववाडी दादर मध्ये लहानाचा मोठा झालो, चाळी होत्या सर्व, साधारण २००४-५ सालची गोष्ट असेल. आमच्या मजल्यावर एका भटक्या मांजरीने काही पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक आमच्याच मजल्यावर राहिला. मजल्याच्या WC च्या पॅसेज मध्ये पडून असायचं. खूप लहान पिल्लू होतं म्हणून त्याच्यासाठी मी आणि माझा भाऊ दूध ठेवायचो आणि त्याच्यावरून आमच्या शेजाऱ्यांशी आमची भांडणं व्हायची. आम्हाला तो काही करू शकत नव्हता मग त्याने त्या पिल्लाला त्रास द्यायला सुरवात केली. पिल्लावर पाणी टाकणे, त्याच्या बसण्याच्या जागेवर पाणी टाकणे असे प्रकार चालू झाले. रोज सकाळी भांडण आणि त्या शेजाऱ्याला शिवीगाळ करून ऑफिस असा प्रकार चालू झाला. त्या पिल्लाच्या आईला कळत होतं आम्ही तिच्या पिल्लाची काळजी घेतोय, इतर कोणी जवळ आले तर ती फिस्करायची. मी एके दिवशी ऑफिस ला गेलो होतो आणि भाऊ पण बाहेर होता त्याचा फायदा घेऊन त्या शेजारच्या डुकराने त्या लहान पिल्लाला ढकलून दिलं, तिसऱ्या मजल्यावरून ते पिल्लू खाली पडलं, माझ्या बाबांन...

कृष्णजन्माष्टमी

एका अद्भुत , अगम्य , नात्यांपेक्षा कर्तव्य आणि कर्म यांना महत्व देणाऱ्या , एका तत्ववेत्त्याचा , एका युद्धकुशल सेनापतीचा , स्त्रीत्वाचा सन्मान राखणाऱ्या पुरुषाचा , प्रेमाची नवीन व्याख्या घडवणाऱ्या , मनुष्यरूपात जन्म घेऊन भगवानपदी पोहोचणाऱ्या , गीतोपदेश करून अज्ञानकाजळी मिटवणाऱ्या युगंधराचा जन्म .  पण आपण मात्र कृष्ण म्हटल्यावर बासरी , गोपिका आणि राधा यातच त्याला गुरफटवून टाकतो . त्याच्या पराक्रमांकडे केवळ चमत्कार म्हणून बघतो . जरासंधाबरोबरच्या युद्धात माघार घेतली म्हणून त्याला रणछोडदास म्हणतो पण तो पळण्याचा निर्णय घेणारा स्ट्रॅटेजिक थिंकर आपण विसरतो . पर्वतासारख्या मोठ्या संकटाचा लीलया बिमोड करतो पण आपण त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करून फक्त अलंकारिक चमत्कारालाच लक्षात ठेवतो .    कृष्णचरित्राचा खरा प्रभाव या कलियुगात फक्त एकाच व्यक्तीवर पडला आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज , बघा विचार करून आक्रमण , प्रतिकार , माघार , सुटका , माणसे जोडण्याची कला आणि मुख्...

जयंती आणि जन्मोत्सव

जयंती आणि जन्मोत्सव   सध्या एक फॅड निघालं आहे जुन्या शब्दांचे विपरीत अर्थ काढून नवीन शब्दांचा सोशल मीडिया वर उंदरासारखं सोडण्याचा .  जन्मोत्सव , हा एक नवीन प्रयोग , जशा गुढीपाडव्याच्या “ शोभायात्रा ” तसाच हा जन्मोत्सव . आणि हा शोध लावणारे सोयीस्कर रित्या तिथ्या विसरतात . नुकताच गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा संबंधशोध लावणाऱ्यांनीच जन्मोत्सवाच्या शोधाचे अकलेचे तारे तोडले आहेत . तारे तोडले म्हटले अशासाठी कारण तिथीप्रमाणे आज छत्रपतींची पुण्यतिथी .  जयंती म्हणजे जन्मदिवस ही एक सोपी व्याख्या आहे मग देवांचे , साधू संतांचे , अवतारी व्यक्तींचे असे भेदभाव कशासाठी . जयंती म्हटल्यावर त्याचा उत्सव होऊ शकत नाही ? मग शिवजयंती काय आहे , दत्तजयंती ( गुरुपौर्णिमा म्हणजे दत्तजयंती नाही ) गणेश जयंती ( माघी ), नृसिंह जयंती , गुरु नानक जयंती , हे जन्मदिवस उत्सव स्वरूप नाहीत ?  थोडक्यात हनुमान जयंती चुकीचे आणि हनुमान जन्मोत्सव बरोबर हा प्रकारच चुकीचा आहे . सावरकर जयं...

अविश्वास ठराव

लोकशाहीची काय विडंबना आहे पहा . रात्री १२ वाजेपर्यंत एकत्र येऊन सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या विषयावर चर्चा आणि मतदान करत होते . जनतेच्या कुठल्या प्रश्नासाठी रात्री १२ पर्यंत खासदारांनी चर्चा केल्याचे ऐकिवात नाही . हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे . मध्यावधी निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा कमी काळ राहिला असताना अविश्वासदर्शक ठराव पटत नाही . या ठरावापुरते बोलायचे झाले तर मोदी सरकार जिंकणार हे निश्चित होते . किती तरस एकवटतात आणि आपल्यापैकी कोण दगा देणार येत्या निवडणुकीत हे स्पष्ट झालं . चंद्राबाबू नायडू सारख्या नेत्याकडून हे अपेक्षित नव्हतं . उद्या प्रत्येक राज्याने विशेष दर्जा पाहिजे म्हणून घोळ घालायला सुरुवात केली तर कसं व्हायचं .  काँग्रेसची प्रत्येक पातळीवर हार झालेली आहे अगदी अविश्वास ठराव दाखल करून घेताना सुद्धा . हा ठराव चर्चेसाठी आणि मतदानासाठी आला चंद्राबाबूंमुळे आणि मग संधी मिळतेय म्हटल्यावर काँग्रेस ने गरळ ओकण्याचा प्रयत्न केला पण गटार च दिसलं . राहुल ग...