Posts

Showing posts from May, 2018

बेनझीर

बेनझीर घायाळ करणारे सौंदर्य आणि तितक्याच ताकदीचा अभिनय आणि म्हणूनच पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती सदमा मधील नेहलता , त्या चित्रपटातील शेवटचा सीन तिच्यातील अभिनय सम्राज्ञी ची पावती देतो . ८३ मध्ये तो चित्रपट बघणे किंवा कळणे शक्य नव्हते . खूप उशिरा तो चित्रपट पहिला आणि अर्थातच तिच्या अभिनयासाठी लक्षात राहीला , नंतर आलेले तिचे अनेक चित्रपट तिच्या लूक्स मुळे लक्षात राहिले मग तो मकसद , नगिना ,  चालबाज , सल्तनत , हीर रांझा . ८७ मध्ये आलेल्या तिच्या मिस्टर इंडिया तिच्या “ काटे नही कटते ये दिन ये रात ” मधल्या परफॉर्मन्स बरोबर लक्षात राहतो तो तिने रंगवलेला चार्ली चॅप्लिन . त्यानंतर आलेला चांदनी , आधी घरच्यांचा विरोध पत्करून प्रियकराबरोबर जाणारी , त्याच्या अपघातानंतर त्याने त्याच्या एकतर्फी विचाराने सोडून दिलेली , नियतीचा हा तडाखा पचवून आयुष्यात पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची स्वप्न बघत असताना जुन्या प्रियकराला पुन्हा बघून दुहेरी कैचीत सापडलेली चांदनी मनात घर करून राहते . जुदाई ...

होळी

होळी महाराष्ट्रातील , एक शारीरिक क्षमतेची आणि हिमतीची कसोटी पाहण्याची प्रथा असलेला सण . पण काळाच्या ओघात ही परंपरा देखील मोडीत निघतेय . केवळ रंग आणि भांग हेच फक्त सेलिब्रेशन च्या नावाखाली " मार्केट " केलं जातं . आणि तेच पुढच्या पिढी समोर मांडलं जातं .  केवळ हिंदू सणांच्या दिवशी पर्यावरणाचा पुळका असलेले आमच्या होलिका दहनाच्या वेळी लागणाऱ्या ओंडक्यांच्या विरुद्ध कंठशोष करतात पण हिरव्यागार शेतजमिनी na करून विकताना मूग गिळून गप्प बसतात . आज आत्मपरीक्षण करायची खूप गरज आहे कारण चुकीच्या प्रथा लहान मुलांना आपल्या खऱ्या प्रथांपासून वंचित ठेवणार . मग ते त्यांच्या पुढच्या पिढीला काय देणार .  पुरणपोळीचा नैवद्य दाखवून , पूजा करून होलिका दहन हा आपला सण आणि त्या पेटलेल्या होळीत नारळ टाकून त्यांचे कोळसे व्हायच्या आत हाताने बाहेर काढणे ही होळीच्या खेळाची प्रथा , अंगात रग आणि मनगटात ताकद असेल तरच हे खेळ खेळता येतील . दुसऱ्या दिवशी उरलेल्या निखाऱयांवर तापवलेल्या पाण्यानी आंघ...