Posts

Showing posts from September, 2017

गौरी लंकेश

महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी च्या दिवशी गणपतींचे विसर्जन होत असताना अचानक न्यूज मीडिया एका गौरी लंकेश नामक व्यक्तीच्या खुनाची बातमी प्रसारित करते आणि कुठलीही शहानिशा न करता विरोधी पक्षांचे हा खून बीजेपी अथवा संघ प्रचारकाने केला आहे या बाबतीत एकमत होते . काँग्रेस सारख्या एकेकाळच्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष कुठलाही पुरावा नसताना , कुठलीही चौकशी झाली नसताना पंतप्रधानांना दोष देऊन मोकळा होतो . आणि या मतिमंदाला पंतप्रधान व्हायचे होते .  धडाधड चक्र फिरतात आणि i am gauri नावाची पोस्टर्स वाटली जातात आणि मेणबत्त्या वाले देखील यात सामील होतात . आणि मग अधिक माहिती बाहेर यायला लागते ,  खून झालेली व्यक्ती जे एन यु मध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्या कन्हैय्याकुमार आणि जुनैदबद्दल सहानभुती बाळगणारी होती . ज्याप्रकारे तिचा खून होऊन अल्पावधीत एवढी विरोधी पक्षांची यंत्रणा काम करायला लागते त्यावरून काही वेगळंच शिजण्याचा वास येतो . कारण केरळ मध्ये होणाऱ्या संघ कार्यकर्त्यांच्या अमान...

भाऊची माफी

भाऊची माफी , फु बाई फु , चला हवा येऊ द्या हे कार्यक्रम बघण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे भाऊ कदम , जगभरात राहणाऱ्यांनी ज्यांना मराठी कळते त्यांनी , मग ते कुठल्याही जातीचे असोत , त्या प्रत्येकानी भाऊ कदम या कलावंताचे नेहमीच कौतुक केले आहे .  आज फेसबुक वर भाऊनी मागितलेला माफी लेख वाचून मन विषण्ण झाले . आणि त्याला ती माफी का मागावी लागली हे कारण वाचून तर तळपायाची आग मस्तकात गेली . भाऊ कदम नवबौद्ध आहे , हे त्या माफीनाम्यामुळेच कळलं , आणि नवबौद्धांच्या २२ प्रतिज्ञेपैकी एक प्रतिज्ञा " की मी कोणत्याही हिंदू देवतेची उपासना करणार नाही " भाऊ कदम कडून मोडली गेली , त्याने या वर्षी घरी गणपती बसवला होता आणि याबद्दल नवबौद्ध समाजाने भाऊ कदम ला त्यांच्या समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती . आणि या धमकीला घाबरून भाऊ कदमनी पुन्हा असं करणार नाही असे लिहून दिलं आहे . ज्या देशात तीन तलाक विरुद्ध निर्णय लागून मुस्लिम स्त्रियांना दिलासा मिळतो त्याच देशात एक विशिष्...