एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना 

दुर्घटनाग्रस्त सर्व कमनशिबी लोकांना श्रद्धांजली, देव त्यांच्या नातेवाईकांना यातून बाहेर पडण्याचे बळ देवो

खरोखर या घटनेमध्ये सरकारचाच दोष आहे ? आपल्या देशातल्या लोकांना आणि विरोधी पक्षांना काही झाले तरी सरकारला दूषणं देण्यात धन्यता वाटते. जे एल्फिन्स्टन ला घडलं ते कुठल्याही स्टेशनवर घडू शकतं अगदी रुंद असलेल्या पुलांवरही आणि याचे कारण म्हणजे शिस्तीचा अभाव आणि स्वतःपुरतं पाहण्याची वृत्ती. पावसापासून बचाव म्हणून पुलाच्या टोकांना गर्दी करून पुलावर देखील गर्दी करणारे या घटनेला जवाबदार नाहीत का ? पूल तुटला अशी अफवा पसरवणारे जवाबदार नाहीत का ? का यासाठी देखील सरकारच जवाबदार. का लोकं पुलावर थांबली आहेत म्हणून रेल्वेनी लोकल्स पण थांबवायच्या. पूल अरुंद आहे म्हणून कंठशोष करणाऱ्यांनो जर पुलाचे बाहेर पडणारे रस्ते आडमुठेपणाने वागणाऱ्या लोकांनी अडवले नसते तर अशी दुर्घटना घडली असती का

मला तर असं वाटतं कि हा घडवलेला अपघात आहे, सरकारविरुद्ध जनमत फिरवण्यासाठी घडवून आणलेला हा अपघात आहे, मुंबईचे नागरिक जे अक्षरशः जन्मापासून लोकल ट्रेन ने फिरतायत, गर्दीने तुडुंब भरलेल्या रस्त्यांवरून, पुलांवरून शिताफीने जाण्याची ज्यांची सवय आहे अशी माणसं केवळ गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन मृत्युमुखी पडतात हे पटतच नाही. म्हणूनच हा घडवलेला अपघात वाटतो

मीडिया, तिने तर ताळतंत्र पूर्णपणे सोडलं आहे, एक एनडीटीव्ही चा व्हिडीओ बघितला त्यात प्रतिक्रिया देणारा सोकॉल्ड प्रवाशी रेल्वे प्रशासनाव्यतिरिक्त काही बोलतच नव्हता, दुसऱ्या एका एबीपी माझाच्या व्हिडिओमध्ये एक १२-१५ वर्षाचा पुलाच्या समोर राहणाऱ्या बिल्डिंगमधला मुलगा त्यांनी वापरला आणि प्रश्न काय विचारला तर "किती लोकं गेली असतील" आणि मुलाचं उत्तर होतं "२२-२३" सणक गेली मस्तकात. आता गेलेल्या लोकांची वय दाखवून इमोशनल ब्लॅकमेल चालूच आहे, आणि विरोधक त्यांना तर थोबाड उघडायला संधीच मिळाली, येणारी बुलेट ट्रेन बहुतेकांच्या डोळ्यात खुपत होतीच त्यामुळे या अपघाताची संधी करण्यात या तरसांना जास्त रस आहे, ज्या ठिकाणी जास्त संख्येने जायला शक्य नाहीये तिथे मोठ्याप्रमाणावर ऑफिस टॉवर काय सर्व नियमांचे पालन करून उभे राहिले असतील ? तेव्हा मलई खाऊन आता ढेकर देत बसलेल्यांना सरकारला दोष देण्याशिवाय काय जमणार

एकेकाळी अक्षरशः रिकामी असणारी विद्याविहार, कांजूरमार्ग, एल्फिन्स्टन सारखी स्टेशनं आज गर्दीने तुडुंब होऊन वाहतायत, फक्त वाढलेली लोकसंख्या नाही तर प्लॅनिंगचा अभाव हे मुख्य कारण आहे

तो धरणात मुतण्याची हौस असलेला बॊबड्याचा अजित म्हणतो आधी लोकल ट्रेन्स कडे लक्ष द्या मग बुलेट ट्रेन आणा, तो ब्लूप्रिंट वाला ठाकरे म्हणतोय बुलेट ट्रेन ची वीट देखील उभी राहू देणार नाही, तो दुसरा ठाकरे म्हणतोय सरकारवर खटला भरणार, याच लोकांनी एनरॉन प्रकल्पाला विरोध केला होता आज महाराष्ट्रातील भारनियमन कोणामुळे होतंय ते लक्षात घ्या. या सगळ्या विरोधकांचा उद्देश विकासाला विरोध हाच आहे, ज्यांना अर्थव्यवस्था कळत नाही, उद्योगव्यवस्था कळत नाही आणि तरी फक्त पैसे कमवायचे आहेत अशांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू  नका. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी आणि आर्थिक तरतूद करून दिली असताना देखील काम का नाही झालं याची चौकशी जरूर व्हायला पाहिजे

आज मनसे असो किंवा उद्धवसेना काँग्रेस असो वा इतर प्रादेशिक विरोधी पक्ष यांना सरकारविरुद्ध इतर कुठलाही मुद्दा मिळत नसल्याने हे असले चाळे ही लोक करत आहेत

कुणाच्याही सांगण्यावरून आपले मत बनवू नका. येत्या केंद्रीय निवडणुकीत विद्यमान सरकार पाडण्याचे हे सगळे निष्फळ प्रयत्न आहेत. आता सगळ्यांना अचानक जाती आठवतायत, अचानक आपण मराठी असल्याचा साक्षात्कार होतो, गुजरात्यांविरुद्ध मराठी लोकांना पद्धतशीर पणे भडकावलं जातंय. या सगळ्या गदारोळात ते गौरी लंकेश प्रकरण बाजूला पडलं, दिल्लीत झालेल्या एका चिमुरड्याच्या खुनाचं प्रकरण बाजूला पडलं. आणि आता काय तर बुलेट ट्रेन. ती तर येणारच अगदी या विरोधकांना चिरडतच येणार

Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

गौरी लंकेश