भगवंत आणि गुरु

भगवंत आणि गुरु


हल्ली अनेक ग्रुप्स वर बरेच मेसेज फिरत असतात आणि गुरुची महती भगवंतापेक्षा जास्त कशी आहे अशा आशयाचे मेसेज देखील असतात

माझ्यामते भगवंता पेक्षा गुरु श्रेष्ठ असा विचार योग्य नाही. भगवंत, परमात्म्याजवळ पोहोचण्याचे मार्ग आहेत

एक, त्या परमात्म्याबरोबर थेट कनेक्शन जे या कलियुगात केवळ अवतारी लोकांनाच शक्य आहे किंवा सत्य त्रेता द्वापार या युगातील पुण्यसंचय या कलियुगातील ज्या जीवाकडे आहे त्यालाच थेट कनेक्शन

दुसरा मार्ग जो कोणत्याही दैवताच्या गणांमार्फत परमात्म्याजवळ पोहोचवतो. मग ते शक्ती स्वरूप असो, शैव किंवा वैष्णव पंथाचे असो भक्तांनी प्रार्थना केल्यावर सर्वप्रथम इष्टदेवतेचे गण कर्म, पाप, पुण्य याचा लेखाजोखा मांडतात आणि तो रिपोर्ट सिग्नेटरी ऑथॉरिटी कडे सही साठी पाठवतात. हा रिपोर्ट अगदी अचूक असतो म्हणून बरेचवेळा भक्त निराश होतात, त्याला भगवंताची अवकृपा समजतात

कलियुगात हे घडणार याची भगवंताला पूर्ण कल्पना होती म्हणून त्यानी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी तिसरा मार्ग बनवला आणि त्याला नाव दिलेगुरु”. पहिल्या मार्गाने त्याच्याजवळ पोहोचलेल्यांना त्यांनी आणखी एक जवाबदारी दिलीलोकोद्धाराची”. हे गुरु देखील रिपोर्ट बनवतात अगदी अचूक, पण यांच्यात आणि गणांमध्ये एक मूलभूत फरक असतो, हे मार्गदर्शन करतात पुण्यसंचय करण्याचे. हे खूप पॉझिटिव्ह विचारांचे असतात पापाच्या तुलनेत एवढा पुण्यसंचय करवून घेतात की आधुनिक मराठीत आपण ज्यालासरप्लसम्हणतो आणि असा पुण्यसंचयाचा सरप्लस आलेला रिपोर्ट सिग्नेटरी ऑथॉरिटी कडे पाठवतात. रिझल्ट अर्थातच खूप सुखाचे असतात पण ते पटकन जादूची काडी फिरवल्यासारखे येत नाहीत, पापानुसार प्रारब्ध भोगावंच लागतं, गुरु त्याकाळात आपल्याला मदत करतात की त्याही काळात आपल्याकडून पुण्यकर्म घडावे

सिग्नेटरी कडे जाणारा रिपोर्ट तर चांगला हवाच पण त्यावर त्याची सही हवीच. वाईट रिपोर्ट वर सही करताना त्या परमात्म्याला काय कष्ट होत असतील. तो आनंदी तर आणि तरच आपण आनंदी


गुरुकृपा 

स्वप्नील सुनील गुप्ते 

Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश