भाऊची माफी

भाऊची माफी,

फु बाई फु, चला हवा येऊ द्या हे कार्यक्रम बघण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे भाऊ कदम, जगभरात राहणाऱ्यांनी ज्यांना मराठी कळते त्यांनी, मग ते कुठल्याही जातीचे असोत, त्या प्रत्येकानी भाऊ कदम या कलावंताचे नेहमीच कौतुक केले आहे
आज फेसबुक वर भाऊनी मागितलेला माफी लेख वाचून मन विषण्ण झाले. आणि त्याला ती माफी का मागावी लागली हे कारण वाचून तर तळपायाची आग मस्तकात गेली. भाऊ कदम नवबौद्ध आहे, हे त्या माफीनाम्यामुळेच कळलं, आणि नवबौद्धांच्या २२ प्रतिज्ञेपैकी एक प्रतिज्ञा "की मी कोणत्याही हिंदू देवतेची उपासना करणार नाही" भाऊ कदम कडून मोडली गेली, त्याने या वर्षी घरी गणपती बसवला होता आणि याबद्दल नवबौद्ध समाजाने भाऊ कदम ला त्यांच्या समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती. आणि या धमकीला घाबरून भाऊ कदमनी पुन्हा असं करणार नाही असे लिहून दिलं आहे.
ज्या देशात तीन तलाक विरुद्ध निर्णय लागून मुस्लिम स्त्रियांना दिलासा मिळतो त्याच देशात एक विशिष्ट समाज त्याच समाजातील गुणी कलाकाराला बहिष्कृत करण्याची धमकी देतो
कसला हा समाज आणि भाऊ तुम्ही माफी मागता ? तुम्हाला हिंदुधर्माबद्दल एवढी पण खात्री नाही की तुम्हाला हिंदुधर्मियांकडून साथ मिळेल ? तुमच्या अभिनयावर प्रेम करणारे काय सगळे नवबौद्ध होते ? तुम्हाला मार्गदर्शन करणारे, तुमच्या कामासाठी तुम्हाला पैसे देणारे काय नवबौद्ध होते
या देशात काय फक्त मागासवर्गीयांवरच अत्याचार झाले इतर समाज काय सुखासीन होता ? मुसलमानांनी या देशात अनन्वित अत्याचार केले पण म्हणून सरसकट सगळ्याच मुसलमानांना वाळीत टाकायचं ? एक काळ असा होता त्यात तुमच्या समाजानी खूप भोगलं पण त्याविरुद्ध आवाज उठवणारे काय फक्त नवबौद्ध होते ? आज स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी तुमचा समाज अजून तळागाळातच राहिला आहे फक्त नेते मात्र सुखवस्तू झाले आणि तरीदेखील सामान्य हिंदू नागरिकांवर तुमचा विश्वास नाही
आम्हाला जेवढा अमिताभ बच्चन आवडतो तसाच इरफान पण आवडतो. आम्ही हिंदू आहोत, जोपर्यंत आमच्या धर्माची विटंबना होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही कोणाला मानता किंवा कोणाला पुजता याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ही असली थेरं चालवून घेणार नाही
भाऊ कदम तुम्ही ही माफी मागून हिंदू बांधवांचा अपमान केला आहेत
पूर्वी बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या केल्याने धर्म बाटला जायचा उदा पाव खाणे, पण आज बदलत्या काळात ती एक अन्नाची गरज बनली आहे म्हणून आज पाव खाणारे बाटले ? किती मुसलमान कलाकार हिंदूंचे उत्सव साजरे करतात, अगदी गणपती सुद्धा बसवतात म्हणून त्यांना त्यांच्या धर्मातून बहिष्कृत केलं जातं ? काही व्यक्तींनी अशी इतरधर्मियांचे उत्सव साजरे करणाऱ्यांवर टीका करणे वेगळं आणि एखाद्या समाजाच्या मान्यताप्राप्त संघटनेने असं बहिष्कृत करणं वेगळं. देवाला मानणं मानणं हा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचप्रमाणे एखाद्या कलाकाराच्या कामाला दाद देणं ही देखील वैयक्तिक बाब आहे. कालपासून माझा चला हवा येऊ द्या बघण्यातला इंटरेस्ट कमी झाला हे नक्की
अशा या समाजविघातक बहिष्काराचा आणि त्या बहिष्काराला दबून दिलेल्या माफीनाम्याचा मी निषेध करतो

Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश