होळी

होळी

महाराष्ट्रातील, एक शारीरिक क्षमतेची आणि हिमतीची कसोटी पाहण्याची प्रथा असलेला सण. पण काळाच्या ओघात ही परंपरा देखील मोडीत निघतेय. केवळ रंग आणि भांग हेच फक्त सेलिब्रेशन च्या नावाखाली "मार्केट" केलं जातं. आणि तेच पुढच्या पिढी समोर मांडलं जातं

केवळ हिंदू सणांच्या दिवशी पर्यावरणाचा पुळका असलेले आमच्या होलिका दहनाच्या वेळी लागणाऱ्या ओंडक्यांच्या विरुद्ध कंठशोष करतात पण हिरव्यागार शेतजमिनी na करून विकताना मूग गिळून गप्प बसतात. आज आत्मपरीक्षण करायची खूप गरज आहे कारण चुकीच्या प्रथा लहान मुलांना आपल्या खऱ्या प्रथांपासून वंचित ठेवणार. मग ते त्यांच्या पुढच्या पिढीला काय देणार

पुरणपोळीचा नैवद्य दाखवून, पूजा करून होलिका दहन हा आपला सण आणि त्या पेटलेल्या होळीत नारळ टाकून त्यांचे कोळसे व्हायच्या आत हाताने बाहेर काढणे ही होळीच्या खेळाची प्रथा, अंगात रग आणि मनगटात ताकद असेल तरच हे खेळ खेळता येतील. दुसऱ्या दिवशी उरलेल्या निखाऱयांवर तापवलेल्या पाण्यानी आंघोळ ही देखील एक प्रथा होती. आणि धुळवड, होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळली जायची, रंग नाही भांग नाही

आजचे होळीचे बीभत्स सेलिब्रेशन बघून मन विषण्ण होते. पण कुठेतरी काही जण आहेत जे ही आपली संस्कृती जपण्यासाठी धडपड करतायेत. माझी पुतणी बदलापूर च्या गुरुकुल शाळेत जाते त्या शाळेने लहान मुलांना होलिकादहन म्हणजे काय ते समजावण्यासाठी प्रत्यक्षात छोटी होळी रचली होती. आणि बरीच वर्षे ते हा उपक्रम चालवतायत आपण देखील असा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. जेणेकरून आपले पारंपरिक सण खरे कसे आहेत हे पुढच्या पिढीला कळेल


स्वप्नील सुनील गुप्ते 

Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश