बेनझीर

बेनझीर


घायाळ करणारे सौंदर्य आणि तितक्याच ताकदीचा अभिनय आणि म्हणूनच पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती सदमा मधील नेहलता, त्या चित्रपटातील शेवटचा सीन तिच्यातील अभिनय सम्राज्ञी ची पावती देतो. ८३ मध्ये तो चित्रपट बघणे किंवा कळणे शक्य नव्हते. खूप उशिरा तो चित्रपट पहिला आणि अर्थातच तिच्या अभिनयासाठी लक्षात राहीला, नंतर आलेले तिचे अनेक चित्रपट तिच्या लूक्स मुळे लक्षात राहिले मग तो मकसद, नगिनाचालबाज, सल्तनत, हीर रांझा. ८७ मध्ये आलेल्या तिच्या मिस्टर इंडिया तिच्याकाटे नही कटते ये दिन ये रातमधल्या परफॉर्मन्स बरोबर लक्षात राहतो तो तिने रंगवलेला चार्ली चॅप्लिन. त्यानंतर आलेला चांदनी, आधी घरच्यांचा विरोध पत्करून प्रियकराबरोबर जाणारी, त्याच्या अपघातानंतर त्याने त्याच्या एकतर्फी विचाराने सोडून दिलेली, नियतीचा हा तडाखा पचवून आयुष्यात पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची स्वप्न बघत असताना जुन्या प्रियकराला पुन्हा बघून दुहेरी कैचीत सापडलेली चांदनी मनात घर करून राहते. जुदाई चित्रपटात उर्मिला मातोंडकर सारखी रंगीला गर्ल असतानाप्यार प्यार करते करतेम्हणत व्हेगास स्ट्रीप वर थिरकणाऱ्या श्रीदेवी वरून नजर हटत नाही. अगदी हल्लीच्या इंग्लिश व्हिन्ग्लीश सारख्या चित्रपटात भाव खाऊन जाणारी श्रीदेवी. पण माझ्या मनात घर करून राहिलेली ती खुदा गवाह मधलीबेनझीरसुरवातीच्या घोड्यावरच्या सीन मध्ये बादशहा खान च्या हाताला हिसका देऊन पुढे जाताना तिच्या चेहऱ्यावरचा शेला हटतो आणि मोकळ्या केसांनी तशीच पुढे घोडदौड करत जाणारी बेनझीर अक्षरशः बघणाऱ्यांची हृदय घायाळ करत जाते. आक्रमक सरदार ते उत्सुक प्रेयसी ते विरहिणी पत्नी काय भूमिका पेलल्यात आणि तेही समोर साक्षात अभिनयाचा बादशहा असताना. बादशहा खान पहिल्यांदा भारतात जायच्या आधीएक मुस्कुराहाटमागतो आणिथोडा औरकरत जेस्माईलमिळवतो ते खरोखर वेड लावणारं होतं. आणि शेवटच्या सीन मध्ये व्हिलन लाबूझकशीच्या बोकडासारखं नेताना बाद्शाहखान कडे बघून केलेलं, आपल्याला नेमकं काय हवंय ते नवऱ्याला कळलंय असं समाधानाचं त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारं समाधानाचं हास्य

आज ते हास्य, ते सौंदर्य, तो अभिनय खरोखरच क्षितिजा पलीकडे गेलाय हे खरं वाटत नाही. ईश्वर तिच्या आत्म्याला सद्गती देवो.


स्वप्नील सुनील गुप्ते 

Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश