अविश्वास ठराव

लोकशाहीची काय विडंबना आहे पहा. रात्री १२ वाजेपर्यंत एकत्र येऊन सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या विषयावर चर्चा आणि मतदान करत होते. जनतेच्या कुठल्या प्रश्नासाठी रात्री १२ पर्यंत खासदारांनी चर्चा केल्याचे ऐकिवात नाही. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. मध्यावधी निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा कमी काळ राहिला असताना अविश्वासदर्शक ठराव पटत नाही.
या ठरावापुरते बोलायचे झाले तर मोदी सरकार जिंकणार हे निश्चित होते. किती तरस एकवटतात आणि आपल्यापैकी कोण दगा देणार येत्या निवडणुकीत हे स्पष्ट झालं. चंद्राबाबू नायडू सारख्या नेत्याकडून हे अपेक्षित नव्हतं. उद्या प्रत्येक राज्याने विशेष दर्जा पाहिजे म्हणून घोळ घालायला सुरुवात केली तर कसं व्हायचं
काँग्रेसची प्रत्येक पातळीवर हार झालेली आहे अगदी अविश्वास ठराव दाखल करून घेताना सुद्धा. हा ठराव चर्चेसाठी आणि मतदानासाठी आला चंद्राबाबूंमुळे आणि मग संधी मिळतेय म्हटल्यावर काँग्रेस ने गरळ ओकण्याचा प्रयत्न केला पण गटार दिसलं. राहुल गांधी मोदींची नक्कल करायला गेला आणि सपशेल तोंडावर आपटला. मला तुम्हाला मिठी मारायची आहे म्हणून उठा असे पंतप्रधानांना सांगणारा मंदबुद्धी काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा दावेदार
नेतृत्वगुण, दूरदर्शीपणा, कूटनीती आणि स्वाभिमान यांचा अभाव असल्यास माणसाचा उद्धव ठाकरे होतो. किती चांगली संधी होती विरोधात मतदान करायला पण शिवसेना तटस्थ राहिली. विरोध करायला हिम्मत लागते. ठराव मंजूर झाला तर पुढील निवडणुकात वेगळं व्हायचं आणि मोदी जिंकले तर तोंड वाकडं करून पुन्हा एकत्र निवडणूक लढवायची असा स्वार्थी विचार शिवसेनेने केला
हुश्श, भारतमातेने एक सुटकेचा निश्वास टाकला असेल आणि देवाकडे प्रार्थना केली असेलदेवा पुढच्यावर्षी देखील मोदी सरकार बहुमताने निवडून येऊ देत” 
आणि आपण प्रार्थना करूयादेवा भारतमातेच्या प्रार्थनेला यश लाभू दे” 

जयहिंद 
स्वप्नील सुनील गुप्ते 

Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश